PHOTO : महागाई विरोधात अमरावतीत काँग्रेसचा एल्गार; डोक्यावर सिलेंडर घेऊन यशोमती ठाकूर यांचं आंदोलन
देशात महागाईचा विस्फोट झाला आहे. इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. अशातच इंधनासह घरगुती गॅस सिलेंडरही महागला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्रात मोदी सरकार आल्यापासून निवडणुकीचा हंगाम वगळता सातत्यानं महागाई वाढत चालली आहे, असा आरोप काँग्रेस नेत्या आणि अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
अमरावती येथील इर्विन चौकात काँग्रेसच्या वतीनं पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सोमवारी महागाई विरोधात आंदोलन केलं.
यावेळी मंत्री यशोमती ठाकूर यांनी चक्क डोक्यावर सिलेंडर घेऊन केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
महाराष्ट्रात इतर राज्यांपेक्षा 10 रुपये पेट्रोल-डिझेल महाग आहे, यावरुनही मंत्री यशोमती ठाकूर यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
या आंदोलनाला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती.
कार्यकर्त्यांकडूनही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.