Malvan Accident : भरधाव डंपरची पाच महिलांना धडक; एकीचा जागीच मृत्यू तर चौघी गंभीर जखमी
सदाशिव लाड, एबीपी माझा
Updated at:
10 Feb 2023 10:02 AM (IST)
1
कुडाळहून मालवणच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने पाच महिलांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
काळसे येथे शेतातून काम करुन घरी परतत असताना भरधाव डंपरने पाच महिलांना धडक दिली.
3
डंपरने दिलेल्या धडकेत रुक्मिणी काळसेकर या महिलेचा जागीच मृत्यू झाला.
4
या अपघातात चार महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
5
डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत होता. दारुच्या नशेत त्याने डंपरने एवढ्या जोरात धडक दिली की, सर्व महिला अक्षरशः फुटबॉलप्रमाणे उडाल्या.
6
चारही महिलांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
7
मालवण पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत.
8
डंपर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
9
अपघात काल (9 फेब्रुवारी) संध्याकाळी 7 वाजता झाला आहे.