Maharashtra Krishi Day : 'लाखांचा पोशिंदा' अडचणीत; त्याला जगवलं पाहिजे
दरवर्षी 1 जुलैला राज्यात कृषी दिवस साजरा करण्यात येत असून 1 जुलै ते 7 जुलै या आठवड्याभराच्या काळात कृषी सप्ताह साजरा केला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्याच्या हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची आज जयंती. त्याचे स्मरण म्हणून राज्यात आज कृषी दिन साजरा करण्यात येतो.
देशाची आणि राज्याची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवरच अवलंबून आहे. त्यातही महाराष्ट्र हे देशातील अग्रगण्य कृषी उत्पादक राज्य आहे.
राज्यातील विकासात शेतकऱ्यांचं मोठं योगदान असलं तरी तो स्वत: मात्र अडचणीत सापडला आहे.
आतापर्यंत राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला आहे. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनाही अडचणींना सामोरं जावं लागतंय.
दुष्काळ, अवकाळी पाऊस, पूर या नैसर्गिक संकटाबरोबरच व्यापारी, दलालांकडून होणारी लूट यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. या सर्व गोष्टींमुळे 'लाखांचा पोशिंदा' आर्थिक अडचणीत सापडला आहे.
केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यामध्ये बदल करुन राज्यात येत्या पावसाळी अधिवेशनात कृषी कायदा मांडण्यात येणार आहे. त्यामध्ये राज्यातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीची धोरणं राबवण्यात येतील अशी अपेक्षा आहे. (सर्व फोटो, एबीपी माझा #येरेयेरेपावसा फोटो स्पर्धा)