Kisan Sabha : लाल वादळ थांबणार की पुढे चालणार?
किसान सभेच्या (Kisan Sabha) वतीनं सुरु असलेल्या लाँग मार्चची (long March) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दखल घेतली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यासह कामगार मंत्री सुरेश खाडे आणि आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित हे किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत बैठक होणार आहे.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेचा लाँग मार्च निघाला आहे. या लाँग मार्चचा आज दुसरा दिवस आहे.
डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वात किसान सभेचा लाँग मार्च निघाला आहे. मागण्या मान्य झाल्या नाही तर मोर्चा सुरुच ठेवणार असल्याची भूमिका
अकोले ते लोणी असा 55 किलोमीटरचा हा लाँग मार्च काढण्यात येणार आहे. या मार्चची आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दखल घेतली आहे.
चर्चेची दारं आम्ही कधीच बंद केली नाहीत. मागच्या बैठकीत ज्या मागण्या आम्ही केल्या त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नाही. त्याबद्दल बोला असे नवले म्हणाले.
वन जमीन, मजुरांचे प्रश्न, आदिवासीचे प्रश्न, कांदा हमीभाव आशा वेगवेगळ्या मुद्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. मागील मोर्चातील काही मागण्या मान्य मात्र उर्वरित मागण्या अद्याप ही प्रलंबित आहेत.
जोपर्यंत चर्चा होणार नाही तोपर्यंत काल रात्री जिथे मुक्काम होता तिथेच थांबणार असल्याची माहिती अजित नवलेंनी दिली आहे.
चर्चा यशस्वी झाली तर मोर्चा स्थगित करु अन्यथा दुपारनंतर पुन्हा पायी मोर्चा सुरू होणार असल्याचं अजित नवलेंनी सांगितलं.
मागण्यासंदर्भात योग्य निर्णय नाही घेतला तर पुढे चालत राहणार असल्याचे नवलेंनी सांगितलं.