Exit Poll 2024
(Source: Poll of Polls)
Long March : इगतपुरीच्या घोटी गावात 'लाल वादळ', किसान सभेचा लाँग मार्च मुंबईच्या दिशेनं
किसान सभेच्या (Kisan Sabha) शेतकरी लाँग मार्चचा तिसरा दिवस. हा मार्च इगतपुरीच्या घोटी गावापर्यंत पोहोचला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमोठ्या संख्येनं शेतकरी या किसान सभेच्या लाँग मार्चमध्ये सहभागी झाले आहे.
विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने हा लाँग मार्च काढण्यात येत आहे. शेतमालाचे पडलेले भाव हक्काच्या वन जमिनी, दिवसा वीज या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्या किसान सभेच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
कांद्याला 600 रुपये प्रति क्विंटल अनुदान द्या. कांदा निर्यातीच्या सर्व शक्यता पडताळून पाहून कांद्याची मोठ्या प्रमाणात निर्यात करा. किमान 2 हजार रुपये दराने कांद्याची नाफेडमार्फत मोठ्या प्रमाणात खरेदी करा.
शेतकऱ्यांच्या शेतीला लागणारी वीज दिवसा सलग 12 तास उपलब्ध करुन द्यावी. शेतकऱ्यांची थकीत वीज बिले माफ करावी.
शेतकऱ्यांची शेती विषयक संपूर्ण कर्ज माफ करुन शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा.
अवकाळी पावसाने आणि वर्षभर सुरु असलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानीची एनडीआरएफमधून तात्काळ भरपाई द्यावी
दूध तपासणीसाठी वापरण्यात येणाऱ्या मिल्कोमिटर आणि वजन काट्यांची नियमित तपासणी करण्याची स्वतंत्र यंत्रणा उभारावी
महाराष्ट्रात आदिवासींच्या राखीव जागांवर जातीची खोटी प्रमाणपत्रे वापरुन बिगर आदिवासींनी नोकऱ्या बळकवल्या आहेत, अशा बोगस लाभार्थ्यांना नोकरीवरुन कमी करुन त्या जागांवर खऱ्या आदिवासींना घ्यावे
सोयाबीन, कापूस, तूर आणि हरभरा पिकांचे भाव पाडण्याचे कारस्थान थांबवावे.