Kalsubai : फलटणच्या सात वर्षाच्या स्वराने केले कळसुबाई शिखर सर
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील गोखळी येथील स्वरा भागवत या सात वर्षाच्या मुलीने महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेल्या कळसुबाई शिखरावर चढाई केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App1 तास 56 मिनिटे एवढ्या कमी कालावधीत कळसुबाईचे शिखर पार करणारी स्वरा सर्वात लहान मुलगी ठरली आहे.
स्वराच्या या यशाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
स्वराने सायं 6 वाजून 1 मिनिटांनी शिखर सर करण्यासाठी सुरूवात केली. 7 वाजून 57 मिनिटांनी हे शिखर सर केले.
कळसुबाई शिखराची उंची ही 1 हजार 46 मीटर आहे. हे शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे
तिच्या या मोहिमेत तिचे वडील योगेश भागवत, अस्लम शेख सहभागी झाले होते.
याआधी स्वराने 10 तासात 143 किलोमीटर सायकलिंग सहाव्या वर्षी विक्रम केला होता
18 फेब्रुवारी रोजी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळील कठीण असणारा हरीहर गडाचा ट्रेक केला.
त्यानंतर दुसऱ्याच दिवशी स्वरा भागवतने शिवजयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेले कळसूबाई शिखर सर केले.
स्वराच्या नावावर 50 प्रकारच्या दोरीवरील उड्या, 1 मिनिटात 100 पुश्यप काढणे आदी विक्रम केले आहेत.
स्वराच्या या यशाने तिच्या आणखी एका विक्रमामध्ये भर पडली आहे.