Happy Labour Day 2023 : महाराष्ट्र दिनानिमित्त कणकवली गावातील नदीच्या दगडापासून साकारले स्टोन आर्ट
महाराष्ट्र दिन (Maharashtra Din 2023) हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
स्टोन आर्ट आर्टिस्ट सुमन दाभोलकर यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त स्टोन आर्ट साकारले आहे.
स्टोन आर्ट आर्टिस्ट सुमन दाभोलकर यांनी विविध क्षेत्रांतील दिग्गजांचे चेहरे साकारण्याचा प्रयत्न केला आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातील काही दिग्गजांचे चेहरे दगडावर साकारले आहेत.
दगडाला कोणताही आकार दिला नाही शिवाय कोणत्याही प्रकारची काटछाट दगडात केली नाही. दगडावर फक्त रंगांनी संस्कार केले आहेत.
कणकवली गावच्या नदीतील हे सारे दगड आहेत.
महाराष्ट्र दिनानिमित्त असे हे सारे दिग्गज एकत्र येतील अशी संकल्पना मनात आली.
कागदाच्या साहाय्याने महाराष्ट्राचा नकाशा साकारला. त्यावर महाराष्ट्रातील काही दिग्गजांचे चेहरे दगडावर साकारले आहेत.
या कलाकृतीसाठी जवळपास तीन तास वेळ लागला.