In pics : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नजरेतून टीपलेला महाराष्ट्र
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आणि त्याच्या कुटुंबाची कलेप्रती असणारी गोडी काही लपून राहिलेली नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्याच्या घडीला आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत राज्याला आधार देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नजरेतील महाराष्ट्राची सफर काही वर्षांपूर्वी सर्वांनाच घडवून आणली होती.
अर्थात, त्यावेळी त्यांच्या खांद्यांवर या पदाची धुरा नव्हती. पण, राज्याच्या राजकारणात मात्र त्यांचा वाटा होता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एक उत्तम छायाचित्रकार आहेत.
कॅमेऱ्याची त्यांची खास मैत्री आहे, हे त्यांनी टीपलेली काही छायाचित्र पाहून लगेचच लक्षात येतं.
महाराष्ट्रातील गड किल्ल्यांपासून इतरही अनेक ठिकाणांचं आकाशातून टीपलेलं दृश्य त्यांनी अद्वितीय पद्धतीनं सर्वांसमक्ष आणलं आणि साऱ्यांच्याच डोळ्याचं पारणं फिटलं.
एका छायाचित्रकाराकडे असणारी नजर आणि त्या नजरेतून अवघ्या एका छायाचित्राच्या माध्यमातून खूप काही सांगण्याचं कौशल्य उद्धव ठाकरे यांच्या कलेत आहे.
सोशल मीडियावर त्यांनी आजवर त्यांच्या या कलेची झलक सर्वांच्या भेटीला आणली आहे.
त्यांच्या या कलेचा नजराणा महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं खास तुमच्यासाठी....
(सर्व छायाचित्र सौजन्य- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे/ इन्स्टाग्राम)