Corona Guidlines : वाडा येथील रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या विवाह समारंभावर धडक कारवाई
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही काही लोक नियम पायदळी तुडविण्याचा प्रयत्न करत आहेत, याचं उदाहरण पुन्हा एकदा पाहायला मिळालं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाडा तालुक्यातील खरीवली मध्ये 'अनच्याव्यू रिसॉर्ट'वर दिनांक 29 एप्रिल रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास उपविभागीय अधिकारी वाडा आणि तहसिलदार वाडा यांना माहिती मिळाल्यानंतर अचानकच धाड टाकण्यात आली.
धाड टाकली असता सदर ठिकाणी जवळपास 100 जण लग्न समारंभ करण्यासाठी एकत्र आले होते.
सदर लग्नास सक्षम अधिकारी यांची परवानगी घेतली नसल्याने महाराष्ट्र शासनाने लग्न कार्यासाठी घालून दिलेल्या निर्बंधाचा भंग केल्याने वर पिता, वधू पिता आणि केटरर्स यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नियमांचा भंग केल्याने 50 हजार रुपये दंडही वसूल करण्यात आला असून, सदरचे रिसॉर्ट सिल करण्याची कारवाईही करण्यात आली आहे