Weather : महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम, वाचा कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
राज्यात थंडीचा जोर कायम आहे. बहुतांश जिल्ह्यात तापमानाचा पारा 10 ते 15 अंशाच्या आसपास आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसर्वात कमी तापमानाची नोंद ही परभणी जिल्ह्यात झाली आहे. परभणी जिल्ह्यात आज 6.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
पुण्यातही तापमानाचा पारा घसरला आहे. पुण्यात 8.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
जळगाव जिल्ह्यातही तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. जिल्ह्यात 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम आहे. नाशिक जिल्ह्यात 9.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
मराठवाड्यातही तापमान घसरले आहे. औरंगाबादमध्ये 9.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
बहुतांश जिल्ह्यात तापमान हे 10 ते 15 अंशाच्या आसपास आहे. त्यामुळं थंडी वाजत आहे. थंडीमुळं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत.
उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अद्याप थंडीचा जोर कायम आहे. परभणीत सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे.
राज्यात सातत्यानं तापमानात चढ उतार होत आहे. याचा शेती पिकावर मोठा परिणाम होत आहे.