Aurangabad News: जायकवाडी धरणासमोरच्या पुलावरून कार पाण्यात कोसळली
पैठण शहरातून दक्षिण जायकवाडी, खुले कारागृह, जुने कावसान, शेवगावकडे जाणाऱ्या नाथसागर धरणाच्या समोर असलेल्या पुलावरून नेहमी वाहतूक सुरु असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र या पुलाला सुरक्षा कठडे नाहीत.
दरम्यान रविवारी सकाळी जुने कावसान येथील उद्धव भगवान मापारी, वर्षा उद्धव मापारी, राम अरुण चेडे हे कारने (एम.एच 20 एनजे 2778) प्रवास करत होते.
मात्र अचानक त्यांची कार पुलावरून गोदावरी नदीच्या पाण्यात कोसळली.
त्यामुळे या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
तर काही नागरिकांनी पाण्यात उतरून कारची काच फोडून जखमी तिन्ही प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.
सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.
मात्र कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
तर जखमी तिघांना तत्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.