Maharashtra Budget 2023 : 9 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प; अधिवेशनाचा कालावधी वाढवा, अजित पवारांची मागणी
विधानभवन येथे विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, छगन भुजबळ, अशोक चव्हाण, जयंत पाटील, आशिष शेलार, अमीन पटेल उपस्थित होते.
यंदा विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार दिनांक 27 फेब्रुवारीपासूनपासून विधान भवन मुंबई इथे होणार आहे.
27 फेब्रुवारी ते 25 मार्च या कालावधीत राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज होणार आहे.
या अधिवेशनात राज्याचा 2023-24 या वर्षाचा अर्थसंकल्प गुरुवारी 9 मार्च 2023 रोजी मांडला जाणार आहे.
राज्यातील प्रश्नांना न्याय देण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान पाच आठवडे घ्यावे, अशी मागणी अजित पवार यांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केली.