Photo: डौलदार चाल, राजबिंड रुप; उजनी जलाशयावर फ्लेमिंगोसह परदेशी पाहुणे दाखल
उजनी जलाशयात फ्लेमिंगोसह 350 पेक्षा जास्त प्रकारचे आकर्षक परदेशी पाहुण्यांचे आगमन झाले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया परदेशी पाहुण्यांना पाहण्यासाठी मुंबई, पुणे , नाशिक सह अनेक ठिकाणाहून पर्यटक उजनीच्या जलाशयाकडे गर्दी करू लागले आहेत.
करमाळा , इंदापूर , दौंड , भिगवण परिसरात उजनी जलाशय मधील या रंगीबेरंगी परदेशी पक्षी दिसत आहेत.
उजनीचे जलाशय 6 किलोमीटर रुंद आणि 140 किलोमीटर लांब पसरले आहे.
जलाशयात मुबलक नैसर्गिक खाद्य, पक्षांच्या ब्रीडिंगसाठी उपयुक्त हवामान यामुळे सैबेरियासह जगाच्या अनेक भागातून हजारो पक्षी नोव्हेंबर सुरू होताच दाखल होतात.
यंदा मात्र जलाशयात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने पक्षी उशिरा दाखल झाले आहेत.
फ्लेमिंगोसह पेंटेड स्टोर्क, ओपन बिल स्टोर्क, पर्पल हेरॉन, ग्रे हेरॉन, सीगल, स्पून बील, लार्ज इग्रेट, नाईट हेरॉन आदी आकर्षक पक्षांची जत्राच या शांत वातावरणात भरलेली असते.
हे सर्व परदेशी पाहुणे पक्षी पावसाळा सुरू होईपर्यंत या परिसरात मुक्काम करतात.
दिवसभर या पक्षांचे नैसर्गिक जीवन अगदी जवळून तर पाहता येते