Maharashtra Bandh : काही ठिकाणी कडकडीत बंद तर काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद, पाहा फोटो!
उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. आज, 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद (Maharashtra Bandh) चं आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आलंय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्र बंदला राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. अशातच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये महाराष्ट्र बंदवरुन खडाजंगी रंगल्याचं पाहायला मिळत आहे.
काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात महाविकास आघाडीचे आंदोलन
महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर कोल्हापुरात शिवसैनिकांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले....
त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या...यावेळी पोलिसांनी सगळ्या शिवसैनिकांना ताब्यात घेतले...आणि महामार्गावरची वाहतूक पूर्ववत केली..
नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचाही महाराष्ट्र बंदला पाठिंबा, मार्केटमध्ये शुकशुकाट
महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदचे आवाहन करत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने रॅली काढली.
हे ढोंगी सरकार आहे, लखीमपूरसाठी बंद केला जातो पण राज्यातल्या शेतकऱ्यांना मदत नाही, देवेंद्र फडणवीसांचा आरोप
अहमदनगरला सरकारच्या महाराष्ट्र बंदला न जुमानता कृषी उत्पन्न बाजार समिती सुरूच ठेवली आहे. तर बाजारात मोठ्या प्रमाणात भाजीपाला, फळे आणि फुलांची आवक पहिला मिळाली. यावेळी नगरच्या बाजार समितीत व्यापारी आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
मविआच्या 'महाराष्ट्र बंद' ला मनसेचा विरोध आहे मग लखीमपूर हत्येला पाठिंबा आहे का -नवाब मलिक
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अल्प प्रतिसाद, भाजपकडून गांधीगिरी, दुकाने उघडल्याने व्यापाऱ्यांचं भाजप कार्यकर्त्यांकडून गुलाब पुष्प देऊन स्वागत
कणकवलीत महाराष्ट्र बंदला प्रतिसाद न देता दुकाने उघडल्याने व्यापाऱ्यांचं भाजप कार्यकर्त्यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं. काही दुकान बंद होती ती उघडून त्यांनाही गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं. त्यामुळे कणकवली भाजपची गांधीगिरी पहायला मिळाली.
अहमदनगरमध्ये बंदला प्रतिसाद नाही, बाजार समितीत व्यापारी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी
महाराष्ट्र बंद शांततेत पार पाडावा, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची सूचना
पूर्व द्रुतगती मार्गावर कार्यकर्त्यांनी रस्ता रोको करण्याचा प्रयत्न