Ekvira Aai : आई एकविरा गडावर तुफान गर्दी! कोरोना नियमांना तिलांजली, पाहा फोटो
आज एकविरा आईचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी कार्ल्यात गर्दी केली आहे. मंदिर परिसर आणि दर्शन रांगेत झालेली भाविकांची गर्दी तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणारी ठरू शकते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज भाविक गर्दी करणार हे स्वाभाविक होतं. त्याअनुषंगाने देवस्थान, पोलिस आणि प्रशासनाने उपाययोजना करणे अपेक्षित होतं.
कार्ला गडाखालून वर पाहिलं की मुंग्यांप्रमाणे भाविक गड चढत असल्याचे दिसून येत होते. नवरात्रीच्या या गर्दिने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण दिलं तर मंदिरांची दारं पुन्हा बंद होऊ शकतात.
मागील वर्षी कोरोनाने देशात शिरकाव केल्यानंतर मंदिरांची दारं भाविकांसाठी बंद झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीची नवरात्र देखील बंद दाराआड साजरी करण्यात आली होती.
येत्या काही दिवसात कोरोना आटोक्यात येत असल्याने राज्य सरकारने मंदिरं सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता.
भाविकांनी चेहऱ्यावर मास्क लावलेला नव्हता, सोशल डिस्टनसिंगच्या नियमाचे पालन केले नव्हते.
मागील वर्षी भक्तांनी आपापल्या घरातूनच देवीला साकडं घातलं होतं. त्यामुळे या वर्षी भक्तांनी दर्शन रांगेत गर्दी केली होती.
कोळी-आगरी समाजासह वेगवेगळ्या ठिकांणाहून भाविक आले असल्याने ट्रॅफिकदेखील झाले होते.