Ashadhi Exclusive : अद्भुत, जबरदस्त, भन्नाट; पंढरीत 12 लाखांहून अधिक वारकरी, हे फोटो पाहून तुम्हाला गर्दीचा अंदाज येईल
आज राज्यभर आषाढीचा उत्साह आहे. पंढरपूरमध्ये आषाढीनिमित्त भाविकांची मांदियाळी आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोनामुळं दोन वर्षांनंतर वारकरी मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत.
यंदा मोठा उत्साह असून 10 लाखांपेक्षा जास्त वारकरी सहभागी झाले असल्याची माहिती आहे.
पंढरपूर आषाढीच्या निमित्तानं गजबजून गेलं आहे.
महाराष्ट्रासह शेजारच्या राज्यातील भाविक मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत
दर्शन रांगेत तासनतास उभे राहत न कंटाळता वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी उभे आहेत
आषाढीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपुरात विठुरायाची महापूजा पार पडली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची ही महापूजा करण्यात आली. मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही पहिलीच महापूजा पार पडली आहे. पहाटे 3 वाजून 10 मिनिटांनी ही शासकीय महापूजा पार पडली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची ही महापूजा करण्यात आली.
आषाढीच्या निमित्तानं चंद्रभागेचं वाळवंट असं खुलुन आलं होतं.
चंद्रभागेच्या काठावर वारकऱ्यांचा हा मेळा किती भव्य आहे, हे या फोटोंमधून दिसून येतंय