NCP Crisis: वर्चस्वाची लढाई, आमदारांची मात्र कोंडी; शरद पवार, अजित पवार दोघांकडूनही व्हीप जारी
सगळ्यात आधी सकाळी 11 वाजता अजित पवार गटाची बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता शरद पवार गटाची बैठक होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबुधवारी (5 जुलै) शरद पवार आणि अजित पवार या दोघांनीही आपल्या समर्थक आमदारांच्या स्वतंत्र बैठका बोलावल्या आहेत.
आजच्या बैठकींसाठी दोन्ही गटांकडून व्हीप जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची कोंडी झाली आहे. कोणाला साथ द्यायची आणि कोणत्या बैठकीला उपस्थित राहायचं? यावरुन राष्ट्रवादीचे आमदार कात्रीत सापडले आहेत.
अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्याकडून शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे दोन्ही गटांना किती आमदारांचा पाठिंबा आहे, हे चित्र आजच्या बैठकीनंतर स्पष्ट होऊ शकतं.
प्रत्यक्षात राष्ट्रवादीच्या 53 आमदारांपैकी 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा अजित पवार गटाकडून सातत्यानं केला जात आहे. या दाव्यामध्ये कितपत तथ्य आहे, हे आज स्पष्ट होईल.
रविवारी न भूतो न भविष्यती शपथविधी महाराष्ट्रासह देशानंही पाहिला. रविवारी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
मुंबई उपनगरातील वांद्रे येथील मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या कॅम्पसमध्ये सकाळी 11 वाजता अजित पवार गटानं बैठक बोलावली आहे.
तसेच, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दुपारी 1 वाजता त्यांच्या समर्थक आमदारांची बैठक घेणार आहेत. दक्षिण मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पक्षाची बैठक बोलावली आहे.
सरकारमध्ये असलेल्या अजित पवारांसह केवळ नऊ आमदारांनी बाजू बदलली असून बाकीचे शरद पवार यांच्यासोबत असल्याचा दावा शरद पवार गटानं केला आहे.
आमदार सरोज अहिरे, प्राजक्ता तनपुरे आणि सुनील भुसारा हे अजित पवार यांच्यासोबत असल्याचं बोललं जात आहे, मात्र त्यांनी शरद पवार यांची भेट आपली निष्ठा व्यक्त केली आहे.