Sunil Kendrekar: पदभार सोडल्यावर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर पत्नीसह पायीच निघाले; पाहा फोटो
त्यांनी शासकीय वाहनातून जाण्यास नकार देत, आपल्या पत्नीसह पायी जात विभागीय आयुक्त ते गुलशन महल असा प्रवास केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान, यावेळी त्यांनी कुठल्याही शासकीय गाडीचा वापर न करता साधेपणाने आपल्या पत्नीसह पायी जात विभागीय आयुक्त ते शासकीय निवास्थान गाठले. यावेळी त्यांच्यासोबत तीन आयपीएस अधिकारी आणि ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी देखील पायी प्रवास केला.
अधिकाऱ्यांचा निरोप समारंभ म्हटलं की, डोळ्यांसमोर जंगी स्वागत करत त्यांना दिल्या जाणाऱ्या निरोपाचे चित्र पाहायला मिळतं. मात्र याउलट चित्र सुनील केंद्रेकर यांच्या निरोपावेळी पाहायला मिळाले.
आपल्या साधेपणामुळे ओळखल्या जाणाऱ्या केंद्रेकरांचा साधेपणा नोकरीच्या शेवटच्या दिवशी देखील दिसून आला.
स्वेच्छानिवृत्तीची घोषणा केल्यानंतर सोमवारी त्यांनी पदभार सोडला. दरम्यान, यावेळी निरोपाचा कोणताही जंगी कार्यक्रम पाहायला मिळाला नाही.
पत्नीसह आलेल्या केंद्रेकरांनी अगदी साधेपणाने शासकीय सेवेतून निरोप घेतला.
विशेष म्हणजे, केंद्रेकरांच्या पत्नी 34 वर्षात पहिल्यांदाच कार्यालयात सोबत आल्या. यापूर्वी त्या कधीही विभागीय आयुक्तालयात आल्या नव्हत्या.