PHOTO : पुण्यात राज ठाकरेंच्या हस्ते हनुमानाची महाआरती
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील खालकर चौकातील मारूती मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त महाआरती केली. यावेळी राज ठाकरे यांनी हनुमान चालिसाचे पठण केले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी पुण्यातील मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आयोजकांनी भगवी शाल आणि गदा देऊन राज ठाकरे यांचे स्वागत केले. शिवाय ढोलताशांच्या गजरात राज ठारे यांचं स्वागत करण्यात आलं.
मशिदीवरील भोंगे हटवले नाहित तर हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा देणारे राज ठाकरे येत्या हनुमान जयंतीला काय करणार याच्या चर्चा होत्या
राज ठाकरे यांच्या या महाआरतीनिमित्त पुण्यात मनसैनिकांनी राज ठाकरे यांचा 'हिंदुजननायक' असा उल्लेख करत पोस्टरबाजी केली आहे.
गुढीपाडव्यानिमित्त मुंबई आणि त्यानंतर ठाण्यातील उत्तर सभेतून राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारसह शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला होता.
राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेचे राज्याच्या राजकारणावर उमटलेले पडसाद अजूनही विरलेले नाहीत
3 मे पर्यंत मशिदीवरचे भोंगे उतरवा, अन्यथा देशभरात हनुमान चालिसा लावणार, या भूमिकेवर राज ठाकरे ठाम आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यात महाआरती झाली.