Raver Lok Sabha Constituency : मतदान केंद्राला चक्क केळीचा बागेचा लुक; मतदारांनाही पडली भुरळ
केळीचा कोठार मानल्या जाणाऱ्या रावेरमध्ये एक मतदान केंद्र चक्क केळीच्या बागेच्या स्वरूपात सजवण्यात आले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया मतदान केंद्रावर आल्यानंतर आपण जणू केळीच्या बागेत आलोय की काय, असा भास मतदारांना होतोय.
ग्रामीण भागामध्ये कृषी विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीने विविध मतदान केंद्रांना वेगवेगळ्या स्वरूपात सजवण्यात आले आहे.
रावेरमध्ये एका मतदान केंद्राला खास केळीचे बागेसारखं सजवले आहे.
रावेर मधील नगरपालिकेच्या शाळेत मतदान केंद्राच्या दाराच्या आत गेल्यावर मतदारांना आपण केळीच्या बागेत आलो आहे की काय असा भास होतो.
कारण या मतदानकेंद्राला केळीची पानं आणि केळीची घळ लावून वेगळ्याच मात्र आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले आहे.
जळगाव केळीचा कोठार असून मतदारांमध्ये केळी पिकाबद्दल जागृती व्हावी, तसेच त्याचे आरोग्याला असलेले फायदे त्यांना कळावे. या दृष्टिकोनातून या मतदान केंद्राला अशा पद्धतीने सजवण्यात आल्याचे मत स्थानिक प्रशासनिक अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
देशासह राज्यात आज लोकसभा निवडणुकांसाठीच्या (Lok Sabha Election 2024) चौथ्या टप्प्याचं मतदान होतंय.
आज राज्यात 11 लोकसभा मतदारसंघात मतदानाची रणधुमाळी रगतांना दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील 11 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी सुमारे 42.35 टक्के मतदान झाले आहे. तर जळगावमध्ये 42.25 टक्के आणि रावेर मध्ये 45. 26 टक्के मतदान झाले आहे.