वर्ध्याच्या शहीद आष्टी गावातील मतदान केंद्राने वेधले साऱ्यांचे लक्ष; राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे केले आवाहन
एखाद्या लग्नाचा मंडप भासवा, सोबतच राष्ट्रीय अभिमानाची भावना जागृत व्हावी, अशी आकर्षक सजावट या ठिकाणी करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशभरातील 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण 88 जागांसाठी सुमारे 15.88 कोटी मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
तर महाराष्ट्रातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, नांदेड, हिंगोली आणि परभणी या आठ मतदारसंघात आज मतदानाचा रणसंग्राम रंगणार आहे.
अशातच लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत्सवात प्रत्येक भारतीयाने आपले मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन करण्यात येत असतं.
आज होऊ घातलेल्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहीद आष्टी या गावातील एका मतदान केंद्राने मात्र साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
वर्धा जिल्ह्यातील शहीद आष्टी या गावाचे देशाच्या स्वांत्र्यलढ्यात महत्वाचं योगदान राहिला आहे.
त्यामुळे शहीद आष्टी मधील गोपाळराव वाघ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बूथ क्रमांक 39, 40 आणि 41 ला निवडणूक यंत्रणेने खास तिरंगा थीमनं सजवलं आहे.
लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदारांने आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्याने मतदारांना केले आहे.