महाराष्ट्र-कर्नाटक, आंध्र प्रदेशच्या 22 गावांना जोडणारा पूल पावसात गेला वाहून, वाहतूक ठप्प, जनजीवन विस्कळीत
महाराष्ट्र-आंध्र कर्नाटकातील २२ गावांना जोडणारा पूल वाहून गेलाय. मागील चार ते पाच दिवसांपासून झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झालंय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमागील चार ते पाच दिवसापासून सततच्या पावसामुळे तिरू नदीला खूप पाणी आलं आणि येथील रस्ता आणि पर्यायी पूर वाहून गेला आहे.
महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक या राज्यासह 28 गावांचा संपर्क असणारा पूल वाहून गेल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.
अतनूर ,गव्हाण, मेवापूर ,चिंचोली, गुत्ती , जळकोट, घोणसी-अतनूर, बाराहाळी, देगलूर, मुखेड, नळगीर अशा 28 गावांना याचा फटका बसला आहे.
लातूरमधील अतनूर हे गाव महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या सीमारेषेंना लागून आहे.
या रस्त्यावरील पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी पूल आणि रस्ता निर्माण करण्यात आला होता
उदगीर तालुक्यातील अतनुर येथील पर्यायी पूल वाहून गेल्यामुळे मुळे वाहतूक ठप्प झाली आहे.