Konkan Photo : तळकोकणातील तळकटच्या जंगलात तब्बल 150 प्रजातींचे पक्षी
महाराष्ट्रातील पश्चिम घाट हा जैवविविधतेने संपन्न आणि विविध प्राणी पक्षांनी नटलेला भाग आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यातील तळकटच्या जंगल परिसरातील पक्षी सौंदर्य टिपण्यासाठी पर्यटक आणि पक्षीप्रेमींना भुरळ पडली आहे.
दक्षिण भारतात आढळणारे अनेक पक्षी तळकटच्या जगलांत आपल्या नजरेस पडतात.
महाराष्ट्रात जे पक्षी नजरेसही पडत नाहीत ते पक्षी आपल्याला तळकटच्या या जगलांत भ्रमंती करताना सहज दृष्टीस पडतात.
दुर्मिळ पक्षी ज्या पक्षांची महाराष्ट्रात फारशी नोंद नाही असे पक्षी सहजपणे तळकट भागात आपल्या नजरेस पडतात.
घनदाट जंगल, पक्षी, वन्य प्राणी, फुलपाखरे, साप, बेडूक अश्या असंख्य गोष्टींनी तळकट चे जंगल समृद्ध आहे.
या भागात वनमानवाचाही अधिवास असल्याचं बोललं जातं. तर वाघांसाठी अतिशय सुरक्षित जंगल म्हणून पाहिलं जातं.
अस्वल, बिबट्या, उतमांजर, शेखरु या जगलांत आढळतात.
उडणारा साप, उडणारा सरडा याचाही अधिवास आढळतो.
महाराष्ट्रातील पश्चिम घाट हा जैवविविधतेने संपन्न आणि विविध प्राणी पक्षांनी नटलेला भाग आहे.