PHOTO : परशुराम घाटातील वाहतूक उद्यापासून नियमित सुरु होणार
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतूक उद्यापासून नियमित सुरु होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहामार्ग रुंदीकरणासाठी घाटातील वाहतूक महिनाभर सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती.
25 एप्रिल ते 25 मे या महिनाभरात ठराविक वेळेत घाटातील वाहतूक बंद ठेवून रुंदीकरणाचं अवघं 65 टक्के काम पूर्ण झालं आहे.
दररोज सहा तास घाट बंदची मुदत आज संपुष्टात येत आहे. कंत्राटदार कंपन्यांची मुदतवाढीची मागणी महामार्ग विभागाने नाकारली आहे.
मुंबई-गोवा महामार्ग कोकणच्या नागमोडी वळणाचा. डोंगरदऱ्यातून तयार केलेला हा महामार्ग. पावसाळ्यात या ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्याने मोठा धोका निर्माण झाला होता.
त्यातच आता काही ठिकाणी रस्ता खचू लागल्याने हा मार्ग धोकादायक बनला आहे. त्यामुळे परशुराम घाटाचे पावसाळ्यापूर्वी काम जलद गतीने पूर्ण होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
काही वर्षांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली होती.
या कामाला गती देऊन पावसाळ्यापूर्वी रुंदीकरण पूर्ण करणं तसंच आवश्यक तिथे संरक्षण भिंत उभारणं यासाठी घाटातील वाहतूक सहा तास बंद ठेवण्यात आली होती
वाहतूक बंदी कालावधीत केवळ कमी वजनाची वाहतूक ही आमडस-चिरणी-लोटे रस्ता कळंबस्ते-आमडस-धामणंद रस्ता मार्गे पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेली आहे.