PHOTO : श्री क्षेत्र जोतिबाच्या नगरप्रदक्षिणेचा उत्साह, राजर्षी शाहू महाराजांनी सुरु केली होती परंपरा
श्री क्षेत्र जोतीबाच्या चैत्र यात्रेचा उत्साह सुरु आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदुसऱ्या दिवशी म्हणजे काल रविवारी रात्री कोल्हापूरची अंबाबाई भक्तांच्या भेटीसाठी बाहेर पडली
याला नगरप्रदक्षिणा असं म्हटलं जातं.
जोतिबाला आलेल्या भक्तांना अंबाबाई देवीचं दर्शन घेता यावं या उद्देशानं सुरु झालेली ही परंपरा आजही मोठ्या उत्साहात जपली जातीय.
कोरोनाच्या प्रसारामुळे गेल्या दोन वर्षे रथोत्सव झाला नव्हता.
जोतिबाच्या चैत्र यात्रेसाठी महाराष्ट्र, आध्रप्रदेश, कर्नाटक,गोवा आणि गुजरात राज्यातील भक्त लाखोंच्या संख्येनं येतात.
या भक्तांना अंबाबाईचं दर्शन घेता यावं यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी 1914 साली देवीची नगरप्रदक्षिणा काढण्याची परंपरा सुरु केली.
तेव्हापासून आजपर्यंत जोतीबा यात्रेच्या दुसऱ्या दिवशी महालक्ष्मी देवीची नगरप्रदक्षिणा काढली जाते.