उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गाडीचं स्टेअरिंग महिला पोलिसाच्या हाती!
आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात (Sindhudurg) एका रणरागिणीने तिन्ही मंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य केले. हे सारथ्य करणाऱ्या महिला कॉन्स्टेबलचे नाव तृप्ती मुळीक (Trupti Mulik ) असून त्या मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील अंबप पाडळी येथील आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुळीक या सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस दलामध्ये आपली सेवा बजावत आहेत.
तृप्ती मुळीक गेल्या दहा वर्षापासून पोलीस दलामध्ये कार्यरत असून लहानपणापासूनच त्यांना ड्रायव्हिंगची आवड आहे.
23 डिसेंबर 2019 रोजी व्हीआयपी ड्रायव्हिंगचा कोर्स पूर्ण करून आज पहिल्यांदाच नवी जबाबदारी पार पाडली.
राज्यात आतापर्यंत महिला कॉन्स्टेबलने उपमुख्यमंत्री असेल किंवा मंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य केल्याचे आपण पाहिले नाही. मात्र आज दिवसभर सिंधुदुर्गात मंत्र्यांचे सारथ्य करणाऱ्या तृप्ती मुळीक यांची जोरदार चर्चा झाली.
व्हीआयपी ड्रायव्हिंग करण्याचा आजचा पहिला दिवस असला तरी तृप्ती यांनी कोणतीही भीती मनात न बाळगता आपली जबाबदारी बिनधास्तपणे पार पाडली.
मंत्र्यांच्या ताफ्यात अनेक गाड्या होत्या. पोलीस ज्या त्या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. मात्र सगळ्यात नजरेस पडेल असे एक दृष्य म्हणजे या तिन्ही मंत्र्यांचे सारथ्य एक महिला कॉन्स्टेबल करत होती.