Maharashtra Police : खाकीतल्या 'सौंदर्यवती'; सौंदर्य स्पर्धा जिंकणाऱ्या या पोलीस महिला अधिकारी, पाहा फोटो
खाकी वर्दीमधील कोणताही अधिकारी डोळ्यासमोर आणला तर बिंधास्त आणि बेधडक व्यक्तिमत्व असणारी व्यक्ती आपल्याला डोळ्यासमोर येते. 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रिदवाक्य डोळ्यासमोर ठेवू आपली जबाबदारी पार पडणाऱ्या पोलीस महिला अधिकाऱ्यांबद्दल प्रत्येकाच्याच मनात आदराची भावना असते.(Pallavi Jadhav/instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशातील महिला पोलीस अधिकारी या त्यांचे कर्तव्य पार पाडतात. तसेच त्या विविध कलागुण देखील जोपासतात. सौंदर्य स्पर्धा जिंकणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची सध्या चर्चा सुरु आहे. (Prema Patil/instagram)
देशातील महिला पोलीस अधिकारी या त्यांचे कर्तव्य पार पडतात. तसेच त्या विविध कलागुण देखील जोपासतात. सौंदर्य स्पर्धा जिंकणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची सध्या चर्चा सुरु आहे.
थायलंड मधील फुकेट येथे झालेल्या मिसेस इंडिया स्पर्धेमध्ये सांगली सीआयडीच्या पोलीस उपअधीक्षक आरिफा मुल्ला या ग्लॅमन मिसेस इंडियाच्या विजेत्या ठरल्या आहेत. याआधी देखील अनेक महिला पोलीस अधिकाऱ्यांनी सौंदर्य स्पर्धेत बक्षीस पटकवलं आहे. त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात....(Arifa Mulla/instagram)
प्रेमा पाटील : पुण्याच्या महिला पोलीस अधिकारी प्रेमा पाटील यांनी 2019 मध्ये मिसेस इंडिया ही सौंदर्य स्पर्धा जिंकली आहे. प्रेमा या सोशल मीडियावर देखील अॅक्टिव असतात. त्यांना इन्स्टाग्रामवर 41 हजारपेक्षा जास्त नेटकरी फॉलो करतात. (Prema Patil/instagram)
पल्लवी जाधव : पीएसआ पल्लवी जाधव यांनी 'ग्लॅमन मिसेस इंडिया 2020' ही सौंदर्य स्पर्धा जिंकली. 2021 मध्ये पल्लवी जाधव यांनी जयपूरमध्ये ग्लॅमॉन मिस इंडिया स्पर्धेत त्यांनी फर्स्ट रनरअप हा किताब जिंकला होता. सोशल मीडियावर पल्लवी यांची क्रेझ आहे. पल्लवी जाधव यांना इन्स्टाग्रामवर एक मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. (Pallavi Jadhav/instagram)
प्रतिभा सांगळे: महिला कॉन्स्टेबल असणाऱ्या प्रतिभा सांगळे या 'मिस महाराष्ट्रा 2021' या सौंदर्य स्पर्धेमध्ये विजयी ठरल्या. प्रतिभा या कुस्तीपटू देखील आहेत. (Pratibha Sangale/instagram)
आरिफा मुल्ला: थायलंडमधील फुकेट येथे मिस इंडिया आणि मिसेस इंडिया स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेसाठी भारतातून एकूण 42 स्पर्धकांची फुकेट येथील अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. 16 ते 20 सप्टेंबर दरम्यान या स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत सांगली सीआयडी विभागाच्या पोलीस उपअधीक्षक आरिफा मुल्ला या थायलंड येथे झालेल्या ग्लॅमन मिसेस इंडिया ठरल्या. (Arifa Mulla/instagram)