Long March : आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही, मागण्यासंदर्भात लेखी आदेश काढावा
जोपर्यंत आमच्या मागण्या लेखी स्वरुपात मान्य केल्या जात नाहीत, तोपर्यंत आम्ही मुंबईच्या दिशेने जाणार असल्याची भूमिका किसान सभेच्या (Kisan Sabha) वतीनं घेण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईच्या दिशेने निघालेल्या किसान सभेच्या नेत्यांची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची प्रदीर्घ चर्चा झाली.
र्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याचे जाहीर केले. मात्र, आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही. त्यामुळं मागण्यासंदर्भात सरकारनं लेखी आदेश काढावा अशी भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली आहे.
आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही जर विश्वास असता तर इथे यावेच लागले नसते असेही काही शेतकऱ्यांनी सांगितले.
सर्व शेतकरी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात दाखल झाले आहेत. सर्वजण तिथेच थांबले आहेत
सर्व शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या निवेदनाची वाट बघत आहेत. जर मागण्या मान्य झाल्या तरच मागे फिरु नाही तर पुढे जाऊ अशा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
अखिल भारतीय किसान सभेचे शेतकरी शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात काल बैठक झाली आहे.
बैठकीत शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. दोन ते तीन तासांच्या बैठकीनंतर तोडगा निघाला आहे.
जोपर्यंत अंमलबजावणी सुरू होत नाही तोपर्यंत मोर्चा तूर्तास त्याच ठिकाणी मुक्कामी राहणार असल्याचे कॉम्रेड जीवा पांडू गावित यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर सांगितलं.
image 11