Photo : हफ्ते थकल्याने चक्क दुचाकीवर नेली दुचाकी, पाहा फोटो
एका शेतकऱ्याने कर्जावर घेतलेल्या दुचाकीचे (Bike) हफ्ते थकल्याने वाहनाच्या कर्ज वसुलीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याची दुचाकी जप्त केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र जप्त केलेली दुचाकी कुण्या मोठ्या वाहनात नव्हे तर चक्क त्यांच्याच दुचाकीवर टाकून घेऊन गेल्याची घटना समोर आली आहे.
ही घटना छत्रपत्री संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील रोटेगाव येथे घडली.
संबंधित कर्मचारी दुचाकीवर चक्क दुसरी दुचाकी घेऊन जात असल्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) प्रचंड व्हायरल झाला आहे.
वैजापूर तालुक्यातील रोटेगाव येथील एका शेतकऱ्याने काही दिवसापूर्वी फायनान्सवर दुचाकी विकत घेतली होती.
मात्र, वेळेवर त्यांच्याकडून हफ्त्याची परतफेड न झाल्याने गुरुवारी (16 मार्च) फायनान्सचे दोन कर्मचारी रोटेगाव येथे त्या शेतकऱ्याच्या घरी गेले.
यावेळी शेतकऱ्याकडे थकीत हफ्ते भरा नाहीतर दुचाकीची चावी द्या, अशी विनंती केली.
मात्र, या शेतकऱ्याने पैसे भरण्यास असमर्थता दाखवली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी दुचाकी जप्त करण्यासाठी चावीची मागणी केली.
शेतकऱ्याने या कर्मचाऱ्यांनी दुचाकीची चावी दिली नाही. यामुळे त्या दोन कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्याची दुचाकी उचलून सोबत आणलेल्या दुचाकीवर टाकून ते वैजापूर फायनान्स कार्यालयाकडे निघून गेले.
दरम्यान रस्त्यावर चक्क दुचाकीवरच दुसरे वाहन घेऊन जाताना अनोखा प्रकार दिसून आल्याने अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये दुचाकी घेऊन जाताना चित्रीकरण केले.
. या घटनेनंतर संबंधित शेतकऱ्याने थकीत असलेली रक्कम भरुन दुचाकी परत मिळवली असली तरी हे कर्मचारी दुचाकी घेऊन जातानाचा व्हिडीओ मात्र, सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.