Rain : राज्यात अवकाळी पाऊस, रब्बी पिकांना फटका
हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (Unseasonal rain) जोरदार हजेरी लावली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात अवकाळी पावसासह काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. या पावसामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
या पावसामुळं शेतकऱ्यांची (Farmers) चिंता वाढली आहे. कारण काही ठिकाणी या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे.
रब्बी पिकांचं तसेच फळबागांचं नुकसान झाल्यानं बळीराजा संकटात सापडला आहे
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावात अवकाळी पावसानं हजेरी लावली.
अर्धापुर तालुक्यातील आंबेगाव,चनापूर, पाटणूर परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. वादळी वाऱ्यामुळं झाडे उन्मळून पडली आहे. केळीच्या बागांना मोठा फटाका बसला.
नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर, मुदखेड तालुक्यात सायंकाळी जोरदार गारपीट झाली. गारपिटीमुळं रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
ज्वारी, गहू, हरभरा, करडी यासारख्या काढणीला आलेल्या पिकांना पावसामुळं फटका बसला आहे.
जोरदार वाऱ्यासह पावसाने झोडपून काढल्यामुळं आंब्याच्या फळ बागेला नुकसानचा सामना करावा लागणार आहे.
हवामान विभागाने वर्तवलेला अंदाजानुसार हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी सायंकाळच्या सुमारास पावसानं हजेरी लावली.