Khandoba Yatra: येळकोट येळकोट जय मल्हार...! पारनेरच्या कोरठण खंडोबा यात्रेला लाखोंच्या संख्येनं भाविक
अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील कोरठण खंडोबा येथील खंडोबाची यात्रा ही प्रसिद्ध आहे.100 फुटाहून अधिक उंच अशा मानाच्या काठ्या हे या यात्रेचे वैशिष्ट्य आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआहे. हा उत्सव पाहण्यासाठी राज्यातून जवळपास सहा लाख भाविक कोरठण या ठिकाणी दाखल झाले होते.
अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा... स्वयंभू तांदळासमोर बारालिंग अशा या देवाचे दर्शन घेण्यासाठी केवळ जिल्ह्यातूनच नाही तर राज्यातून मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते..
तीन दिवस या देवाची यात्रा सुरू होती आजचा यात्रेचा मुख्य दिवस होता, या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे बेल्हा आणि ब्राह्मणगाव येथून आलेल्या मानाच्या उंच काठ्या
विशेष म्हणजे या काठ्या जवळपास दीडशे फूट उंच एवढ्या होत्या.. लाखोंच्या संख्येने आलेले भाविक या मानाच्या काठ्या मंदिराच्या कळसाला आणि देवाच्या गाभाऱ्यात टेकवतात.
तीन दिवस चालणाऱ्या या यात्रा उत्सवासाठी नगर , पुणे , नाशिक आणि ठाणे येथून मोठ्या संख्येने भाविक हे कोरठण खंडोबा येथे दाखल झाले होते.
या यात्रेत भंडारा आणि खोबऱ्याची उधळण केली जाते. यंदा पोलीस प्रशासनाच्या वतीने भाविकांच्या दर्शनासाठी प्रशस्त रस्त्यांची , पार्किंगची, खेळण्याच्या, प्रसाद तसेच खाऊच्या दुकानांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली होती
कोरोनानंतर प्रथमच झालेल्या तीन दिवशीय या यात्रा उत्सवाला यंदाही मोठी गर्दी पाहायला मिळाली
लाखोंच्या संख्येने दरवर्षी भाविक या यात्रेसाठी येत असल्याने आणि दरवर्षी भाविकांची मांदियाळी वाढतच असल्याने या देवस्थानकडे येण्यासाठीचा रस्ता आणखी प्रशस्त करण्याची मागणी होत आहे.
भाविकांच्या गर्दीनं श्री क्षेत्र कोरठण खंडोबा फुलुन गेलं होतं.