PHOTO: कमाल! बुलढाण्यातील आठवीच्या विद्यार्थ्यानं केला प्लास्टिकपासून गॅस तयार करण्याचा प्रकल्प, विज्ञान प्रदर्शनात कौतुक
विद्यार्थ्यांची सुप्त शक्ती जागृत करून त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी बुलढाणा येथे विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आलं होतं
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया प्रदर्शनीमध्ये 116 प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले
त्या प्रकल्पाचे महत्त्व तसेच त्याची प्रात्यक्षिक, त्याचे फायदे याविषयी माहिती दिली
यामध्ये वर्ग आठवीमध्ये शिकणाऱ्या धनंजय थोरात याचा फेकलेल्या प्लास्टिक पासून गॅस तयार करण्याचा प्रकल्प उत्कृष्ट ठरला आहे.
धनंजय थोरातला या भन्नाट प्रयोगाच्या शोधामुळं द्वितीय बक्षीस मिळाले.
बुलढाणा येथील शारदा ज्ञानपीठमध्ये शिकणारा धनंजय थोरात हा आठवीत शिकणारा विद्यार्थी उत्कृष्ट ठरला.
त्याने फेकलेल्या प्लास्टिकपासून गॅस तयार करण्याचा प्रकल्प विज्ञान प्रदर्शनीत ठेवला होता.
त्याच्या या प्रकल्पाला अनेकांनी भेटी दिल्या आणि कौतुकही केले.
धनंजय थोरातच्या प्रकल्पाला द्वितीय बक्षीस मिळाले आणि त्याचा सत्कारही करण्यात आला
या विज्ञान प्रदर्शनातील जवळपास सर्वच प्रयोगांचं कौतुक उपस्थितांनी केलं.