Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kartiki Ekadashi 2022 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापुजा संपन्न
महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी वारीनिमित्त शासकीय महापूजा पार पडली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.
आषाढी आणि कार्तिकी या दोन्ही महापूजेचा मान मिळवणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिले राजकारणी ठरले आहेत.
पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी उपमुख्यमंत्र्यांचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आगमन झालं.
विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला त्यानंतर मंत्रोपचारामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्निक पूजा करण्यात आली.
औरंगाबादच्या साळुंखे दाम्पत्याला उपमुख्यमंत्र्याबरोबर शासकीय पूजा करण्याचा मान मिळाला.
आषाढी आणि कार्तिकीची पूजा करायला मिळाली ही पांडूरगांची कृपा, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापुजेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सपत्निक नामदेव वाड्याला भेट दिली. नामदेव महाराज मंदिराचं दर्शन घेतलं.
यावेळी नामदेव महाराजांच्या 17 व्या वंशजांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नामदेव पगडी घालून सत्कार केला.
यावेळी अमृता फडणवीस यांनी एक महिला आणि एका मुलीसोबत फुगडी खेळली. तर देवेंद्र फडणवीस यांनीही एका वारकऱ्यासोबत फुगडी खेळली.