Kartiki Ekadashi 2022 : कार्तिकी एकादशीच्या महासोहळ्यासाठी विठ्ठल मंदिरात 15 प्रकारच्या फुलांची आकर्षक सजावट
वर्षभरात साजरा केल्या जाणाऱ्या एकादशीमध्ये कार्तिकी एकादशी महत्वाची मानली जाते. कार्तिकी एकादशीलाच प्रबोधिनी एकादशी असे देखील म्हटले जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावर्षी 4 नोव्हेंबर 2022 रोजी (उद्या) प्रबोधिनी एकादशी साजरी केली जाणार आहे. या दिवसापासून लग्न, गृहप्रवेश यांसारख्या विधींना सुरुवात होते. हिंदू धर्मात कार्तिकी एकादशीला विशेष महत्त्व आहे.
कार्तिकी एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास केला जातो. तुळशी विवाहाची सुरुवात देखील याच दिवसापासून होते आणि कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे.
कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरपूरच्या विठूरायाच्या मंदिरात तुळशी विवाह पार पडतो आणि नंतर दुसऱ्या दिवसापासून राज्यभर तुळशी विवाहाला प्रारंभ होतो.
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात मोठी यात्रा भरते. राज्यभरातून वारकरी मंडळी सावळ्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात.
कार्तिकी एकादशीनिमित्त राज्यातील विविध विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची सजावट केली जाते.
कार्तिकी एकादशीच्या महासोहळ्यासाठी आज विठ्ठल मंदिरात 15 प्रकारच्या तब्बल 6 टन फुलांची आकर्षक सजावटीला सुरुवात झाली असून पुणे येथील भाविक राम जांभुळकर हे सजावट करत आहेत.
विठ्ठल सभामंडप, रुक्मिणी सभामंडप, महाद्वार , विठ्ठल सोळखांबी, चौखांबी या ठिकाणी 15 कारागीर ही सजावट करीत असले तरी या सजावटीचे सर्व पॅटर्न पुणे येथील 40 कारागिरांनी तयार केले आहे.