Ambabai Temple : अंबाबाई मंदिरात आढळला 12व्या शतकातील यादवकालीन संस्कृत शिलालेख
श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नैसर्गिक संगमरवर काढण्याचे काम सुरु आहे. हे काम सुरु असतानाच 12 व्या शतकातील शिलालेख सापडला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्य मंदिरातील सरस्वती मंदिराच्या पूर्वेकडील भिंतीवरील संगमरवर काढण्यात आल्यावर 2 बाय 1 फूट दगडी शिलालेख सापडला आहे.
दगडी भिंतीवर कोरलेल्या 12व्या शतकातील संस्कृतमधील शिलालेखाने मंदिराच्या समृद्ध वारशावर अधिक प्रकाश टाकला गेला आहे, ज्याची मूळ रचना आठव्या शतकाच्या आसपास बांधली गेली होती.
भिंतीवर आडव्या पद्धतीने शिलालेख आहे. त्यावर १६ ओळींमध्ये गड्डेगली ( म्हणी) कोरल्या आहेत. मराठीमध्ये गड्डेगली किंवा कन्नडमधील गड्डेगालू ही स्थानिक संस्कृती आणि अनुभवांवर आधारित म्हणी आहेत.
ताजा शिलालेख हा 12 व्या शतकातील यादवकालीन शिलालेख आहे. यावरूनच मंदिराचा वारसा किती समृद्ध आहे याची माहिती मिळते.
यापूर्वी मंदिराच्या आवारात नवग्रह मंदिराच्या खांबांवर दगडी शिलालेख सापडले होते
यापूर्वी मंदिराच्या आवारात नवग्रह मंदिराच्या खांबांवर दगडी शिलालेख सापडले होते
याशिवाय शेषाई मंदिरातील हालेगनदा शिलालेख, गजेंद्र लक्ष्मी मंदिरातील यादवकालीन शिलालेख आणि महाद्वार येथील सिंघनदेव शिलालेख आढळून आला होता.
दरम्यान, मिळालेल्या प्राचीन शिलालेखाबाबत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती लवकरच सविस्तर माहिती देणार आहे.
अंबाबाई मंदिराचा समृद्ध वारसा किती प्रचंड आहे याबाबत पुन्हा एकदा संगमरवरी काढल्याने अधोरेखित झाले आहे.