Kartiki Ekadashi 2021 : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न
आज कार्तिकी एकादशी... कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर पहिल्यांदाच पंढरपूर विठुरायाच्या नामघोषानं दुमदुमून निघालं आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरातल्या विठ्ठल मंदिराला 14 प्रकारच्या देशी-विदेशी फुलांनी सजावट करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंढरपुरात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज पहाटे विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली.
नांदेड जिल्ह्यातले वारकरी कोंडीबा देवराम टोणगे आणि त्यांच्या पत्नी प्रयागबाई हे दाम्पत्य यावेळी मानाचे वारकरी ठरले.
कोंडीबा टोणगे आणि त्यांच्या पत्नी प्रयागबाई हे दाम्पत्य गेली 30 वर्षे पंढरपूरची वारी करतायत. नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातील निळा गावचे ते रहिवासी आहेत.
कोरोनामुळे गेल्या वर्षी कार्तिकी वारी होऊ शकली नव्हती. तब्बल दोन वर्षांनी कार्तिकी वारीचा सोहळा आज पंढरपुरात होतोय. त्यामुळे वारकऱ्यांचे पाय पंढरपूरकडे वळलेत.
पण यंदा एसटीच्या संपाचं सावट या यात्रेवर आहे. आणि नेहमी एसटीनं पंढरपुरात दाखल होणाऱ्या वारकऱ्यांची संपामुळे गैरसोय झालीय. तरीही मिळेल त्या वाहनानं वारकरी पंढरपुरात दाखल झालेत. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पुन्हा एकदा गजबजलं आहे.