Kartiki Ekadashi 2021 : विठू नामाचा गजर... कार्तिकी एकादशीनिमित्त सजली पंढरी; विठुरायाच्या राऊळीला आकर्षक सजावट
आज कार्तिकी एकादशी... कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर पहिल्यांदाच पंढरपूर विठुरायाच्या नामघोषानं दुमदुमून निघालं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरातल्या विठ्ठल मंदिराला 14 प्रकारच्या देशी-विदेशी फुलांनी सजावट करण्यात आली आहे.
फुलांनी सजलेले विठ्ठल आणि रुक्मिणीमाता गाभारा, नामदेव पायरी, विठ्ठल सभामंडप भक्तांच्या डोळ्याचे पारणे फेडताहेत.
पुणे येथील विठ्ठल भक्त राम जांभुलकर यांच्या वतीनं ही सजावट सेवा विठ्ठलाच्या चरणी अर्पण करण्यात आली आहे.
पंढरपुरात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज पहाटे विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली.
कोरोनामुळे गेल्या वर्षी कार्तिकी वारी होऊ शकली नव्हती. तब्बल दोन वर्षांनी कार्तिकी वारीचा सोहळा आज पंढरपुरात पार पडतोय. त्यामुळे वारकऱ्यांचे पाय पंढरपूरकडे वळलेत
पण यंदा एसटीच्या संपाचं सावट या यात्रेवर आहे. आणि नेहमी एसटीनं पंढरपुरात दाखल होणाऱ्या वारकऱ्यांची संपामुळे गैरसोय झालीय.
तरीही मिळेल त्या वाहनानं वारकरी पंढरपुरात दाखल झालेत. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पुन्हा एकदा गजबजलं आहे