In Pics: बाबासाहेब पुरंदरेंची प्रकृती चिंताजनक, रुग्णालयात उपचार सुरू
बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी मराठी साहित्य, इतिहास, नाटकं अशा प्रत्येक क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं. नुकतेच 29 जुलैला त्यांनी 100 व्या वर्षात पदार्पण केलं आहे.
बाबासाहेबांना 2015 साली महाराष्ट्र भूषण तर 2019 साली पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. बाबासाहेब पुरंदरे यांनी 'महाराष्ट्र भूषण' या सन्मानाबरोबर मिळालेल्या 10 लाख रुपयांतील फक्त 10 पैसे स्वत: जवळ ठेऊन उरलेल्या पैशात आणखी 15 लाख टाकून ही सर्व रक्कम कर्करोगग्रस्तांच्या मदतीसाठी दिली.
इतिहासाविषयी अभिमान, सत्यासत्यता तपासण्यासाठीची संशोधक वृत्ती, संयम, चिकाटी, एक प्रकारचा भारावलेपणा-वेडेपणा, स्मरणशक्ती आदी गुणांचा समुच्चय बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आहे.
शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनी अथक संशोधनातून व परिश्रमांतून 'राजा शिवछत्रपती' हा ग्रंथ साकारला.