Jejuri Photo : जेजुरीच्या खंडोबाची चैत्र पौर्णिमेनिमित्त दवणा पूजा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Apr 2022 09:22 PM (IST)
1
अखंड महाराष्ट्राचे लोकदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाची चैत्र पौर्णिमेनिमित्त दवणा पूजा करण्यात आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
खंडोबा देवाचे मानकरी आणि प्रगतशील शेतकरी सचिन जगदाळे आणि लक्ष्मण जगदाळे यांनी पूजेसाठी हा दवणा अर्पण केला आहे.
3
चैत्र शुद्ध पौर्णिमेला दुसऱ्या प्रहरी, चित्रा नक्षत्र वसंत ऋतू या शुभदिवशी श्री शंकरांनी मार्तंडभैरव अवतार धारण केला.
4
तेव्हापासून दरवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेला खंडोबाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेजुरी नगरीत मोठी यात्रा भरते.
5
विशेषतः या यात्रेस बहुजन बांधव आणि शेतकरी मोठ्या संख्येने येतात.
6
येणाऱ्या भाविकांकडून कुलधर्म कुलाचार केला जातो
7
सलग आलेल्या चार दिवस सुट्ट्यामुळे जेजुरीत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.