Photo : पालेभाज्यांच्या पावडर उद्योगातून जळगावमधील महिला कमावते लाखो रूपये
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पळसखेड येथील वंदना पाटील या महिलेने पालेभाज्यांची पावडर करून त्याच्या विक्रितून लाखो रूपये कमावले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपाटील यांनी आपल्या व्यवसायातून दहा महिलांना रोजगार देखील दिला आहे.
वंदना पाटील यांनी भाज्या निर्जलीकरणाचा प्रकल्प उभारला आहे.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पळसखेड येथील वंदना पाटील यांच्याकडे पाच एकर शेती आहे.
शेतीमध्ये त्या भाजी पाल्याचं उत्पन्न घेत असतात. मात्र ज्या वेळी भाजी पाल्याचे उत्पादन येते त्यावेळी बाजारात भाज्यांचे दर घसरतात. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागते.
शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेतून पावणे सहा लाख रुपयांचे कर्ज घेऊन हा प्रकल्प पाटील यांनी सुरू केला आहे.
वंदना पाटील यांनी आपल्या गावातील काही महिलांना सोबत घेऊन गायत्री फूड उद्योग नावाने हा उद्योग सुरू केला आहे.
या उद्योगात मागणीनुसार त्या भाज्या कोरड्या करून किंवा त्याची पावडर करून विक्री करतात.
यामधे प्रामुख्याने कांदा, टमाटा, बिट, शेवगा पाला, मेथी, पालक, कोथींबीर, कढी पत्ता, आलं इत्यादी भाज्यांच्या समावेश आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून त्यांचा हा प्रकल्प सुरू झाला आहे.
भाज्या कोरड्या करून नायट्रोजन गॅसमध्ये त्याचे व्यवस्थित पॅकिंग केल्यास या भाज्यांची पावडर त्याच्या गुणवत्तेसह एक वर्षापर्यंत सहज राहत असल्याचा दावा वंदना पाटील यांनी केला आहे.