Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra News: जी 20 च्या पार्श्वभूमीवरील तयारीचा पालकमंत्री भुमरेंकडून पाहणी
यानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी जी 20 निमित्त झालेल्या सुशोभीकरणाच्या विविध कामांची पाहणी केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपाहणी दौऱ्याची सुरवात सकाळी 10 वाजता विमानतळापासून झाली.
बीबी का मकबरा या ठिकाणी पाहणी दौऱ्याची सांगता झाली.
यावेळी भुमरे यांच्यासह सहकार मंत्री अतुल सावे, आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डये, औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजीत चौधरी, पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता उपस्थित होते.
यावेळी वेगवेगळ्या विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री भुमरे यांनी सुशोभीकरणसाठी लावण्यात आलेली झाडे उन्हामुळे सुकून जाऊ नये याची काळजी घेण्याची सूचना दिली.
यावेळी भुमरे यांनी कामांचे कौतुक केले.
G-20 परिषदेसाठी येणाऱ्या पाहुण्यांना नाथसागर भेटीसाठी प्रशासनाने आग्रह करावा, असेही भुमरे म्हणाले.
तसेच सर्व सौंदर्यीकरण व सुशोभीकरण कामे आज रात्री पर्यंत संपवण्याचे निर्देश त्यांनी दिले.
तसेच बीबी का मकबरा मुख्य दरवाजाच्या डावीकडील बागेमध्ये सर्व ठिकाणी फुल झाडे लावण्याचे निर्देश दिले.