Photo : अहमदनगरमधील गंगामाई साखर कारखान्याला भीषण आग
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील सीमा हद्दीपासून जवळच असलेल्या बाबुळगाव येथील गंगामाई साखर कारखान्याच्या डीसलरी विभागात मोठा स्फोट झालाया.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्फोटामुळे कारखान्याला भीषण आग लागली.
ही घटना शनिवारी सायंकाळी घडली असून दर पाच मिनिटाला स्फोट होत आहेत.
अग्निशमन दलाच्या जवानांकडून घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे.
गंगामाई साखर कारखान्यात नेहमीप्रमाणे डीसलरी विभागात कामगार काम करीत असताना अचानक स्फोट झाला.
स्फोटानंतर कारखान्याला भीषण आग लागली.
कारखान्याला भीषण आग लागल्यामुळे कामगारांनी आपला जीव मुठीत धरून पळापळी सुरू केली.
आग लागलेली घटनेची माहिती दोन्ही तालुक्यातील शासकीय यंत्रणांना मिळतात अग्निशम दलासह रूग्णावाहिका घटनास्थळी दाखल झाल्या.
आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, सतत स्फोट होत असल्यामुळे आग भडकत आहे.
घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली असून या घटनेस सहा लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.