Irshalwadi Landslide: इर्शाळवाडी नेमकं कशासाठी प्रसिद्ध आहे? आणि बहुसंख्य लोक दरवर्षी तिथे का जातात? पाहा...
इर्शाळवाडी हे गाव इर्शाळगडाच्या पायथ्याशी आहे. इर्शाळगड हा महाराष्ट्राच्या दुर्गश्रृंखलेतील महत्त्वाचा किल्ला आहे. इर्शाळवाडी इर्शाळगडामुळेच प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात अनेक ट्रेकर्स, पर्यटक या गडाला भेट देण्यासाठी येतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवीकेंडला इर्शाळगडावर मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात.
इर्शाळवाडी हे इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेलं गाव असून या गावातूनच गडासाठीचा चढ सुरू होतो.
गडाच्या उत्तरेस कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगड आहे, तर ईशान्येस माथेरान आहे. गडावरून पश्चिमेकडे मोरबे धरणाचं दृश्य दिसतं.
इर्शाळगड हा किल्ला रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यात असून त्याची उंची 3,700 फूट आहे. मुंबई-पुणे जुना महामार्गावर चौक जवळ मोरबे धरण येथे जाण्यासाठी मार्ग आहे. याच मार्गाने पर्यटक किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचतात.
अनेक लोक इर्शाळगडावर ट्रेकिंग करण्यासाठी येतात. हा गड सर करण्यासाठी दोन तासांचा कालावधी लागतो. हा गड चढण्यासाठी प्रचंड अवघड आहे.
इर्शाळगडाला 'विशाळगड' असं दुसरं नाव सुद्धा आहे. स्थानिक लोक या डोंगरास जिनखोड या नावाने ओळखतात.
इर्शाळगड हा किल्ला माथेरानच्या दक्षिणेस आहे आणि पूर्वी या ठिकाणी राहणारे युरोपियन लोक या किल्ल्यास 'सॅडल हिल' या नावाने ओळखायचे.
इर्शाळगडाच्या माथ्यावर जाण्यासाठी खडक फोडून वाट तयार करण्यात आली आहे. किल्ल्याच्या माथ्याचा चढ थोडा अवघड आहे.
किल्ल्याचं प्रमुख आकर्षण म्हणजे वर असलेलं नैसर्गिक छिद्र, ज्याला मराठी नेढे किंवा इंग्रजीत ‘नीडल्स आय’ असं म्हणतात. सामान्य उंचीच्या माणसाला आरपार जाता येईल असं हे नेढं आहे.
कडा चढताना अवघड ठिकाणी शिडी तसेच दोरखंडाचा आधार घेऊन वर जावं लागतं. गडाचे सर्वोच्च ठिकाण म्हणजे इर्शाळगड सुळका. इथे पोहोचण्यासाठी गिर्यारोहक कौशल्याने चढतात.
वीकेंडला इर्शाळगडावर मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. बुधवारी रात्री दरड कोसळल्याची घटना घडल्याने यात कोणताही पर्यटक किंवा ट्रेकर अडकलेला नाही.
मात्र पायथ्याशी असलेलं इर्शाळवाडी गाव उद्ध्वस्त झालं आणि अनेकांचा मृत्यू झाला, अनेक घरं उद्धवस्त झाली.