India: काय आहे नेमकी Emergency Alert ची भानगड? सकाळी तुमच्याही मोबाईलवर आला का मेसेज? जाणून घ्या

Emergency Alert Notification: अनेकांच्या मोबाईलवर आज सकाळी एमर्जन्सी अलर्टचं नोटिफिकेशन आलं आणि हा एखाद्या फ्रॉडचा प्रकार तर नाही ना? अशी चर्चा सुरु झाली. हा मेसेज नेमका कशामुळे आला? समजून घेऊया...

Emergency Alert Notification

1/6
गुरुवारी (20 जुलै) सकाळी दहा-साडेदहा वाजताच्या सुमारास अनेकांच्या मोबाईलवर Emergency Alert चा पॉपअप मेसेज आला. भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने हा आपत्कालीन संदेश पाठवल्याचं त्यात नमूद होतं.
2/6
हे नोटिफिकेशन पाठवताना भारत सरकारकडून कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. त्यामुळे नागरिकांच्या मनात या अलर्टबाबत भीती निर्माण झाली.
3/6
प्रथम हा संदेश इंग्रजी भाषेत आणि नंतर मराठी भाषेत देण्यात आला. काहींच्या मनात या मेसेजबाबत भीती निर्माण झाली, तर काहींनी या मेसेजकडे सवयीप्रमाणे दुर्लक्ष केलं.
4/6
तर या मेसेजबद्दल घाबरुन जाण्याचं काहीच कारण नाही. सध्या केंद्र सरकार एमर्जेन्सी अलर्ट सेवेची चाचणी घेत आहे आणि त्यामुळेच हा मेसेज पाठवण्यात आला होता.
5/6
सध्याचा अलर्ट हा केवळ चाचणी म्हणून होता, त्यामुळे गोंधळून जाण्याचं किंवा काळजीचं कोणतंही कारण नाही. हा संदेश धोक्याचा नसून केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाकडून पाठवण्यात आला होता.
6/6
भविष्यात आपल्या विभागात काही एमर्जेन्सी सूचना द्यायच्या असतील, तर आपल्याला अशा प्रकारचा एक आपात्कालीन अलर्टचा मेसेज येऊ शकतो. या मेसेमद्वारे तुमच्यापर्यंत विशिष्ट माहिती केंद्र सरकार पोहोचवू शकतं.
Sponsored Links by Taboola