Yoga Day 2023 : तरुण पिढीला लाजवणारा रमा आजींचा उत्साह!

आज आतंरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day) आहे. आपलं शरीर निरोगी ठेवणं, या समृध्द शरीराला कोणत्याही प्रकारचा आजार न होऊ देणं अशी प्रत्येक वयोगटातील व्यक्तीची इच्छा असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
त्यासाठी अनेक जण अनेक प्रयत्न देखील करतात. पण आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्या शरीराकडे लक्ष देणं फारसं कोणाला जमत नाही. त्यातच हल्लीच्या खाण्याच्या सवयी, झोपेच्या विचित्र वेळा आणि मानसिक तणाव निर्माण करणारा दिनक्रम याने तरुण पिढी अनेक आजारांच्या लवकर स्वाधीन होते

तसेच वयाच्या अगदी 30 मध्येच अनेकांना अनेक औषधं असतात. याच तरुण पिढीला लाजवेल असा एक उत्साह सध्या रत्नागिरीमध्ये आहे
रत्नागिरीच्या रमा जोग या आजबाईंनी वयाच्या साठाव्या वर्षी योगसाधनेला सुरुवात केली आहे. इतकच नव्हे तर या आजीबाईंनी योगसाधना करत त्याचं मेरुदंडाचं ऑपरेशन देखील टाळलं आहे.
खरंतर योगसाधना ही मानवी शरीरासाठी अत्यंत महत्त्वाची गरज आहे. आपल्या समृध्द शरीराला निरोगी ठेवण्यासाठी योगसाधना ही कायमच उपयुक्त ठरते ही बाब कोणीही नाकारु शकणार नाही.
रत्नागिरीच्या रमा जोग या आजीबाईंनी हीच गोष्ट लक्षात ठेवत त्यांनी योगसाधनेला सुरुवात केलीच पण त्यांनी अनेक योगशिक्षक देखील घडवले आहे.
एबीपी माझाने योगादिनानिमित्त या आजीबाईंशी खास बातचीत केली. एबीपी माझाशी बोलतांना या आजीबाईंनी सांगितलं की, 'रत्नागिरीला 2007 साली एका शिक्षक योगा शिबिरात मी सहभागी झाले.
त्यानंतर मला जिल्ह्याच्या योगशिक्षक पदी निवडण्यात आलं.संपूर्ण जिल्ह्यात त्यानंतर मी योगाशिबिर घेण्यास सुरुवात केली.
निरोगी आयुष्यासाठी योगसाधना महत्त्वाची असल्याचा कानमंत्र या आजीबाईंनी तरुण पिढीला दिला आहे.'
रमा आजीं या आता संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात नाही कर देशभरात योगाची शिबिरं घेतात. सध्या त्यांच्यावर कोकणातल्या तीस तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली. आता रमा आजी या अगदी हरिद्वारपर्यंत एकटीने प्रवास करतात.