Rain : यंदाचा ऑगस्ट महिना ठरला इतिहासातील सर्वात कमी पावसाचा
देशाच्या काही भागात पाऊस चांगला पाऊस (Rain) झाला आहे. तर अनेक ठिकाणी अद्यापही म्हणावा तसा पाऊस झाला नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात काही प्रमाणात पाऊस झाला. मात्र, ऑगस्ट (August) महिन्यात पावसानं चांगलीच ओढ दिल्याचं पाहायला मिळालं.
यावर्षीचा ऑगस्ट महिना हा इतिहासातील सर्वात कमी पावसाच्या ऑगस्ट महिन्यांपैकी एक ठरला असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ अनुपम काश्यपी (Anupam Kashyapi) यांनी दिली. तर महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात उणे 12 टक्के पावसाची नोंद जाली आहे.
ऑगस्ट महिना कोरडा गेला असला तरी सप्टेंबर महिन्यात पावसाची शक्यता हवामान विभागानं दिली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याची माहिती अनुपम काश्यपी यांनी दिली.
ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात उणे 12 टक्के पावसाची नोंद महिन्यात झाली आहे. तर मध्य महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यात उणे 24 टक्के, मराठवाड्यातील सहा जिल्ह्यात उणे 22 टक्के आणि विदर्भातील पाच जिल्ह्यांमधे उणे 14 टक्के पावसाची नोंद झाली आहे.
ऑगस्ट महिना कोरडा गेला असला तरी सप्टेंबर महिन्यात पावसाची शक्यता असल्याचे काश्यपी म्हणाले. अरबी समुद्रातील मॉन्सूनची शाखा कोकणात पाऊस देण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरातील मॉन्सूनच्या शाखेकडून विदर्भात पाऊस मिळेल अशी माहिती काश्यपी यांनी दिली.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळं मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस किती असेल आणि किती कालावधीसाठी असेल हे बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र कोणत्या दिशेनं प्रवास करेल यावर अवलंबून असणार आहे.
ऑगस्ट महिन्यात निर्माण झालेला पावसाचा बॅकलॉग सप्टेंबर महिन्यात भरुन निघेल का? हे आत्ताच सांगता येणार नसल्याची माहिती अनुपम काश्य यांनी दिली.