जालना तणाव! दगडफेकीत 37 पोलीस जखमी, महिला पोलिसांचाही समावेश
Jalna Protest : जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार तर, पोलिसांवार गावकऱ्यांनी दगडफेक केल्याचा आरोप होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआंदोलकांनी दगडफेक केल्याने लाठीचार्ज करावा लागला असल्याचे पोलिसांनी म्हटले असून, यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
जालना येथील घटनेत एकूण 37 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे.
जालना येथील घटनेत जखमी झालेल्या सर्व जखमी पोलिसांवर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
यात अनेक महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी देखील जखमी झाले असल्याचे पाहायला मिळत आहे.
काही महिला पोलीस गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर देखील औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
कोणाच्या डोक्याला, कोणाच्या पायाला तर कोणाच्या हाताला गंभीर जखमा झाल्या आहेत.
दगडफेकीत जखमी झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे.
काही पोलीस गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत असून, पोलिसांकडून सर्व परिस्थितीवर लक्ष असल्याचे पाहायला मिळत आहे.