Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं तब्बल 13 वर्षांनी एकत्रित रक्षाबंधन
राखी पौर्णिमेला मुंडे घराण्यातील बहिण-भावाची चर्चा सुरु असतेच. राजकारणात एकमेकांचे विरोधक असणारे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे राखी पौर्णिमेच्या निमित्ताने एकत्र आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी आज रक्षाबंधन सण साजरा केला. 2009 नंतर प्रथमच मुंडे कुटुंबियांचे एकत्रित रक्षाबंधन पार पडले.
2009 नंतर म्हणजे 13 वर्षांनी मुंडे कुटुंबीयांनी एकत्रित राखी पौर्णिमेचा सण साजरा केला.
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या रक्षाबंधनाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
राखी पौर्णिमेनिमित्त राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज आपल्या भगिनी पंकजा मुंडे यांच्यासह प्रीतम मुंडे आणि यशश्री मुंडे यांच्याकडून राखी बांधून घेतली.
मुंडे कुटुंबियांच्या रक्षाबंधनाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
धनंजय मुंडे यांना तिन्ही बहिणींनी राखी बांधली.
पंकजा मुंडे यांच्यासह प्रीतम मुंडे आणि यशश्री मुंडे यांच्याकडून धनंजय मुंडे यांनी राखी बांधून घेतली.
राजकीय विरोधामुळे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दुरावले होते. यंदा मात्र एकत्रित येत रक्षाबंधन सण साजरा केला.