In Pics: भिंतींवर चित्र काढत कलाकारांनी केली जनजागृती
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. देशातील महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब, मध्यप्रदेश, दिल्ली, गुजरात, कर्नाटक आणि हरियाना राज्यात कोरोना झपाट्याने वाढतो आहे. देशात कोरोना व्हायरसच्या सुरूवातीपासूनच वेगवेगळ्या माध्यमांद्वारे कोरोना व्हायरसची जनजागृती करणारे उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच दरम्यान वेगवेगळ्या शहरातील कलाकारांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये भिंतींवर मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा अशा जनजागृती करणाऱ्या संदेशांचे चित्र काढले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाल दिवसभरात देशात 40,953 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 188 लोकांनी आपला जीव गमावला.
देशातील आजपर्यंतची कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 15 लाख 55 हजार 284 आहे.
आजपर्यंत देशात कोरोनाने एक लाख 59 हजार 558 लोकांचा मृत्यू झाला आहे.
सध्या देशात 2 लाख 88 हजार 394 कोरोनाबाधित रुग्ण आहेत.
कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या एक करोड 11 लाख 7 हजार 332 आहे.
देशात आतापर्यंत 4 करोड 20 लाख 63 हजार 392 लोकांना लस देण्यात आली आहे.
देशातील महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब, मध्यप्रदेश, दिल्ली, गुजरात, कर्नाटक आणि हरियाना राज्यात कोरोना झपाट्याने वाढतो आहे.
संपूर्ण देशात महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. काल दिवसभरात महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व खासगी कार्यालये आणि आस्थापनांमध्ये ( आरोग्य, इतर अत्यावश्यक सेवा, आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) इतर ठिकाणी 50 टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार, पुढील काही दिवसात सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत. लग्नसमारंभात देखील 50 पेक्षा जास्त लोकांना उपस्थित राहता येणार नाही.
महाराष्ट्रात आतापर्यंत 24 लाख 22 हजार 021 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 21 लाख 89 हजार 965 रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत.