पोह्याला महागाईची फोडणी; पोहे 5 तर शेंगदाणा प्रति किलो 20 रुपयांनी महागले तर जिऱ्याच्या किंमतीतही वाढ
पोह्यांच्या दरात वाढ झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता आपला सकाळचा नाश्ताही महागणार आहे.
गेल्या तीन दिवसात पोहा प्रति किलो 5 रुपयांनी महागला आहे.
शेंगदाणा प्रति किलो 20 रुपयांनी महागले आहेत.
तर जिऱ्याच्या किंमतीतही वाढ झाली आहे
मात्र दर वाढल्याने पार्श्वभूमीवर गृहीणांचा बजेट कोलमडणार आहे.
एकूणच काय तर सकाळच्या नाश्तामध्ये जर गरमा गरमा पोह्यांचा विचार करणार असाल तर आता तुमच्या खिशाला कात्री बसणार हे नक्की...
प्रत्येकाच्या घरात पोहे गरजेच असतात आणि पोहे लवकर बनवले जातात.
जर पोहेच महाग झाले तर कसं होणार? सामान्य माणसांचं कसं होणार? गृहिणी म्हटलं म्हणजे नाश्त्याला काय बनवायचा हा प्रथम विचार येतो.
पोहे जे प्रत्येकाच्या घरात असतात आणि कोणालाही कधीही पाहुणे आले तर सहजरित्या बनवले जातात, अशी प्रतिक्रिया गृहिणीने दिली आहे.